यावल येथील निकृष्ठ कामांच्या चौकशीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार

यावल, प्रतिनिधी । येथील पंचायत समितीची सर्वसाधारण मासिक सभा ही तालुक्यातील विविध प्रश्नाना घेवुन गाजली असुन, प्रशासकीय पातळीवर शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेक महत्वांच्या कामांचा गोंधळ उडाला असुन या सर्व प्रश्नांवर पंचायत समितीचे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील यांनी बैठकीस उस्थितांसमोर प्रलंबीत कामांचा पाढा वाचुन चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान यावल पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी , गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी पंचायत समितीच्या विरोधी गटाचे नेते शेखर पाटील यांनी यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातुन रोजगार हमी योजना अंतर्गत होत असलेली बंधाऱ्यांची कामे ही शासकीय निविदा प्रमाणे होत नसल्याचे सांगुन कामांचे संबंधीत ठेकेदार हे सर्व नियम व अटीशर्ती धाब्यावर ठेवुन गुणवत्ता नसलेली निकृष्ट प्रतिची कामे करीत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली तसेच त्यांनी मागील दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेतील प्रश्न क्रमांक२८९तील सिंचन विभागाचे अभीयंता यांनी सिंचन विभागाची कामे ही पुर्णत्वास आलेली आहेत व काही कामे ही पुर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आलेली असल्याची माहीती सिंचन अभीयंता यांनी दिली यावेळी प्रशासकीय पातळीवर सिंचन विभागाच्या कामांच्या उदघाटनाप्रसंगी स्नमानिय सदस्यांना शासनाचे परिपत्रक असतांना बोलविण्यात येत नाही ही बाब अत्यंत गंभीर व खेदजनक आहे . आपल्याच गटातील शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन सिंचन विभागाच्या माध्यमातुन झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असुन, तरी संबंधीत ठेकेदारांनी केलेली कामे व त्यांची गुणवत्ता तपासणी झाल्याशिवाय त्यांची बिले अदा करण्यात येवु नये असा ठराव सर्वसाधारण सभेत झाला असतांना त्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही असा गंभीर प्रश्न शेखर पाटील यांनी सभेत उपस्थित केला असुन , याबाबतचे माहीती पत्र आपण जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभीयंता यांना दिला असतांना ही जर कामांची चौकशी करण्यास दिरंगाई होत असेल तर आपण जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याची सुचनाही या बैठकीत पाटील यांनी दिली . या सर्वसाधारण मासिक बैठकीस पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे तसेच सदस्य सौ .कलीमा सायबु तडवी, सरफराज तडवी , दिपक अण्णा पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते .

Protected Content