जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सूपूर्द केला आहे. याप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, मुख्याधिकारी बबन तडवी यांचेसह पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.
चौधरी कुटूंबाची 51 हजार रुपयांची मदत
यावल येथील मनीष शशिकांत चौधरी, चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, सौ. कांचन मनीष चौधरी, सौ. सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांचेतर्फे प्रत्येकी 5 हजार रुपये तर सुमंच पेपर प्रोडक्टस् लि. यांचेतर्फे 31 हजार रुपयांची मदत कोरोना संकटाचा मुकाबला करण्यसाठी सामाजिक जाणीवेचे भान राखत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली असून या मदतीचा धनादेश चौधरी कुटूंबियांनी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांचेकडू सुपूर्द केला आहे. याबद्दल डॉ थोरबोले यांनी चौधरी कुटूंबियांचे कौतूक केले तसेच दानशूरांनी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन केले.