यावल, प्रतिनिधी । येथील तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस व हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्वातंत्र चळवळीचे महानायक नेताजी डॉ . सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदचे गटनेते व कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून पुष्पहार अपर्ण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह मुसा शाह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव संजय नन्नवरे, वढोदे ग्रामपंचायत सदस्य संदीप सोनवणे , बडोदा गुजरात येथील सामाजीक कार्यकर्ते सुनील बिरारी, चेतन सोनवणे, आबा सोनवणे, योगेश सोनवणे यांच्यासह आदी नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.