यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲन्टी रॅगिंग सेक्सुअल हॅरेसमेंट या विषयावर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवशीय व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चंद्रकांत झोपे, समीर झांबरे, दर्पण पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्तेॲड शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲन्टी रँगिंग ही संकल्पना स्पष्ट केली. विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्याला कमकुवत बनवण्याचे काम ॲन्टी रॅगिंग मार्फत होत असते. शिक्षण संस्था,अनाथालय,वसतिगृह, ह्या ठिकाणी जास्त रॅगिंग होत असते. विद्यार्थ्यांची छेडछाड ,पिळवणूक, त्यांच्या जिवाशी खेळणे, ह्या मार्फत कोणताही विद्यार्थी परिस्थितीचा बळी ठरू शकतो. भारत देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उडीसा ,पश्चिम बंगाल, मध्ये रॅगिंग चे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यासाठी शासनाने १९९९ चा कलम २ नुसार २ वर्ष तुरूंगवास १० हजार रू दंड ५ वर्ष शिक्षण संस्थेत प्रवेश नाही.हा कठोर कायदा केला आहे.असे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲन्टी रॅगिंग हे संकल्पना स्पष्ट मांडली वर्तमान युगात कोणतेही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला विद्यार्थी, विद्यार्थिनीला मनस्ताप टारगेट करून बोलणे, आपण स्वतःची तुलना दुसऱ्या बरोबर करणे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी कोणतेही कारण नसताना चेष्टा मस्करी करून नाव बदनाम करणे. ही रॅगिंगची उदाहरणे आहेत. महाविद्यालयात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा गणवेश आणि ओळखपत्र सोबत बाळगायला हवे म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख पटते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर कापडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. रजनी इंगळे यांनी केले तर आभार प्रा. प्रतिभा रावते यांनी मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील डॉ.हेमंत भंगाळे , डॉ. आर. डी. पवार , डॉ. पी. व्ही. पावरा , डॉ. संतोष जाधव, प्रा. सुभाष कामडी, प्रा. प्रशांत मोरे , डॉ. निर्मला पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.