यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख वक्ते पी. आर. पाटील होते तर अध्यक्षस्थानी डॉ. सुधा खराटे यांनी भूषविले. उपप्राचार्य प्रा. एम .डी. खैरनार यांनी प्रास्तविकात प्राध्यापक प्रबोधिनी स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. संध्या सोनवणे यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून प्रबोधिनीचे उद्घाटन केले. याप्रसंगी डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध विषयाच्या ज्ञानाचे व माहितीची देवाणघेवाण होऊन शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. प्रबोधिनीचे प्रथम पुष्प गुंफणारे पी.आर. पाटील यांनी आजची शिक्षण पद्धती यावर मार्गदर्शन करताना वैदिक काळातील गुरुकुल पद्धत, ब्रिटिश कालीन पद्धत व वर्तमानकालीन शिक्षण पद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात डॉ. खराटे यांनी शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक व बौद्धिक विकास होणे महत्त्वाचा असतो असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार सी. के. पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, संजय पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. पी.व्ही. पावरा, डॉ.एस.पी. कापडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.