यावल, प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी वेरूळ औरंगाबाद या प्राचीन स्थळाची शैक्षणिक सहल नुकतीच आयोजित करण्यात आली आहे.
सहलीद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन, मध्ययुगीन इतिहास प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहुन शिकविण्याचा प्रयत्न शिक्षकांनी अभ्यास पुर्वक केला. विद्यार्थ्यांनी वेरूळ, खुलताबाद, औरंगाबाद, भद्रावती या ठिकाणांना भेट दिली. सर्वांच्या सदैव स्मरणात राहील अशा सहलीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. सहलीला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख व्ही. बी. पाटील, प्रा. ए. एस. अहिरराव, डॉ. अनिल पाटील, प्रा. नजमा तडवी, कालिमा तडवी यांनी परिश्रम घेतले. सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी जितेन्द्र बारेला, समीर तडवी, रफीक तडवी , नदीम तडवी , सोमसिंग सस्ते, रवीन्द्र वळवी, दयाराम बारेला, सुवालाल बारेला, विद्यार्थीनी कोमल पाडवी, वंदना पाडवी , मनीषा वसावे व निता वसावे यांच्यासह सुमारे ६० विद्यार्थ्यांनी या ऐतिहासीक अभ्यास सहलीमध्ये अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने या ऐतिहासीक सहलीमध्ये वेरूळ व औरंगाबाद भद्रावती खुलदाबाद आदी पुरात्न अशा ऐतिहासीक प्राचीन स्थळांचे अभ्यासपुर्वक दर्शन घेतले.