यावल मधील व्यावसायिकांची रॅपीड एंटीजन चाचणी

 

यावल, प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील विविध व्यवसायीक दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांनी आप-आपल्या भागात आरोग्य विभागाकडून लावलेल्या आरोग्य शिबीरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रॅपीड एंटीजन तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी केले असून या तपासणी मोहीमेस यावल शहरातील व्यवसायीकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या दोन दिवसात यावल ग्रामीण रुग्णालयात २६७ तर दि २० ऑगस्ट रोजी १८४ नागरीकांनी आपली एंटीजन स्वॅब तपासणी केली असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. या तपासणी करीता दुकानदारांनी व परिसरातील व्यापाऱ्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

या आरोग्य तपासणी मोहीमेत जे फेरीवाले आणि दुकानदार तपासणी करणार नाहीत त्यांना१४ दिवस होम क्वारेन्टाईन करून विलगीकरण करणात पाठविण्यात येईल व प्रसंगी अशा बेजबाबदार नागरीकांची दुकान बंद करण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्या व्यवसायीकांवर साथीरोग का्द्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ अजीत थोरबोले यांनी आदेशात नमूद केले आहे.

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या रॅपीड एंटीजन स्वॅब तपासणी मोहीम यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला, रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी सुर्यकांत पाटील , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके , सुभाष राणे , छाया कोळी , पिन्टु बागुल हे सहभागी आहेत.

Protected Content