यावल प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून यावल-भुसावळ रस्त्याची अवस्था दयनिय झाली होती. रस्ता लवकरात लवकर दुरूस्त व्हावा अशी मागणी तालुक्यातील वाहनधारकांकडून होत होती. या रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात झाली असून वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावल ते भुसावल ह्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासुन अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने या मार्गावर बऱ्याच वेळा रस्त्यावरून लहान-मोठे अपघात होत असतात वाहनधारकांच्या होणाऱ्या त्रासाला केन्द्रस्थानी ठेवुन सदरील रस्ता त्वरित दुरुस्त करावा, यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बैठकीत सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी जोरदार मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी उपस्थित केला होता.
संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन यावल भुसावळ रस्त्याचे काम व डागडुजी करण्याचे काम तात्काळ सुरू केले असुन सदरचे काम हे त्वरित सुरू केल्याने कामास गती मिळाली असुन , काम प्रगतीपथावर सुरू झाले आहे. याबद्दल प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी वाहनधारकांची डोकेदुखी ठरलेल्या या जिवघेण्या मार्गाचा प्रश्न काळजीपुर्वक मार्गी लावल्याने यावल व परिसरातील नागरीकांसह विशेष करून वाहनधारकांच्या वतीने सर्वत्र त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे , सदरच्या या वाहन वर्दळीचा मार्ग वारंवार मोठमोठी खड्डे पडुन खराब होत असतो तरी संबंधीतांनी व यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाकडे अधिक लक्ष देवुन अधिका अधिक चांगले काम ठेकेदाराकडून करून घ्यावे अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे .