यावल : प्रतिनिधी । येथील सामाजीक कार्यकर्ते राहुल बारी यांची भाजप शहर कार्यकारणीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
यावल येथील श्रीराम मंदीरातील आवारात भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे , जि प आरोग्य व शिक्षण सभापती रविन्द्र पाटील, जि प सदस्या सविता भालेराव , जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील , पं स सभापती पल्लवी चौधरी , तालुकाध्यक्ष उमेश फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपुत ,शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी , जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपास्थितीत विचारमंथन बैठक पार पडली
विविध विषयांवर विचारविर्मश करण्यात येवुन राहुल बारी यांची पुर्नप्रवेश निवड करण्यात आली या प्रसंगी पक्षाच्या वाढीसाठी आपण आत्मविश्वासाने कार्य कराल अशी अपेक्षा पक्षातील प्रयुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आपण या पुर्वीच सक्रीय कार्यकर्ते म्हणुन कार्य केले असुन या कामाची दखल घेत आपल्या कार्याची पावती पक्षाच्या वतीने या निवड रुपाने करण्यात येत असल्याचे निवडपत्रात म्हटले आहे .