यावल प्रतिनिधी । येथील बसस्थानकावर दोन महीलांना एका प्रवासी महीलेच्या पर्समधील रोकड पैसे चोरतांना महीलेच्या व प्रवासांच्या सावधानतेमुळे व पोलीसांच्या सर्तकतेमुळे दोन चोरट्या महीलांना पकडण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, यावल येथील बसस्थानकावर मागील आठवडयात तीन प्रवासी महीलांचे सोन्याचे मंगळसुत्र आदी जवळपास ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडली. याच पार्श्वभुमीवर पोलीसानी आपली शोधमोहीम वेगवेगळया मार्गाने राबवली असतांना आज बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास यावल बसस्थानकावर चोपडा-बुरहानपुर बस क्रमांक एमएच १२, ९८२८ मधुन रावेर येथे जाण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत प्रवाशी महिला उषाबाई साहेबाखों तडवी वय-३५ रा. आडगाव ता. यावल या बसमध्ये रावेर जाण्यासाठी चढत असतांना दोन महीलांनी माझ्या पर्समध्ये ठेवलेले १० हजार रूपये काढत असतांना लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. बसस्थानकावरील नागरीक धावुन आल्याने व तात्काळ पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे आपल्या पोलीस पथकासह बसस्थानकावर दाखल झाले व त्यांनी तात्काळ चौकशी करत चोरट्या महीलांना ताब्यात घेतले. रिना सुकदेव मानकर (वय-३५) आणि क्रांती इनष मानकर (वय-२५) दोन्ही रा. रेल्वे स्टेशन लालबाग बुरहानपुर, मध्यप्रदेश असे दोन्ही संशयित महिला आरोपींची नावे असून दोघांना यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.