यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांच्या अधिन राहून शिस्तीने सामाजिक बांधिलकी जोपासत येणारे सण साध्यापणाने साजरे करावे असे आवाहन फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी केले.
यावल येथील पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुवर, यावल पोलीसचे प्रभारी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश सुरेश गडे, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, नगरसेवक दिपक बेहेडे, पुंडलीक बारी यांच्यासह शहरातील गणेशत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी गणेशत्सव साजरा करतांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या चाकोरीत राहुन सण साजरे करावे, असे आवाहन तहसीलदार जितेंद्र कुवर व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण आणि जेष्ठ शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान यांनी उपस्थित श्रीगणेशभक्तांना केले.
प्रत्येक गणेशत्सव मंडळाच्या पाच कार्यकर्त्यांना आपली रॅपिड अँटीजन तपासणी ही शासनाने अनिर्वाय केली असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांकडुन यावेळी सुचित करण्यात आले. उपस्थितांचे आभार देखील पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी मानले .