यावल, प्रतिनिधी । येथील पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहकार्यानी गुप्त माहीतीच्या आधारावर जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल करण्यात आलेला फरार आरोपीस पाठलाग करून अटक केली.
सविस्तर वृत्त असे की, यावल पोलीस स्टेशनमध्ये वड्री व परिसरातील शेतकऱ्यांना ठीबंक नळ्या मिळुन देण्याच्या नांवाखाली २o१९ मध्ये फसवणुक केल्याचा आणि इतर काही गुन्हे मुबारक नबाब तडवी यावर दाखल आहे. तो एका गुन्ह्यात जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असताना त्याला वैद्यकीय तपासणी घेवुन जात असतांना तो पोलीसांना गुंगारा देत फसार झाला होता. मुबारक नबाब तडवी विरूद्ध भादवी ४०६, ४२०. २२४या गुन्ह्याचे आरोप आहेत. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना गुप्त माहीती मिळाली असता आरोपी मुबारक तडवी हा वड्री गावाजवळ असलेल्या मराठी जिल्हा परिषदच्या शाळे जवळील केळीच्या बागेत लपुन बसला असल्याची माहीती मिळाली. आज दिनांक ५ मार्च रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे, निलेश वाघ, गणेश ढाकणे व पोलीस मित्र युवराज धारू यांनी घटनास्थळी जावुन केळीच्या बागेत लपुन बसलेल्या या फरार सराईत गुन्हेगारास पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मुबारक तडवी यांने पळवुन जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्याचा एक किलोमिटर जंगलात पाठलाग करून अखेर त्यास पकडण्यात यश आले.