यावल प्रतिनिधी । यावल आयसीटीसी विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम व आधार बहूउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक एड्स दिन सप्ताह पंधरवडा निमित्ताने आज १४ डिसेंबर रोजी यावल पंचायत समिती येथे ग्रामीण रुग्णालय भव्य रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकासअधिकारी डॉ . निलेश पाटील हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तर शिबीराचे उद्घाटन डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणुन सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमांन तडवी, पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक अजय पाटील होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील सर यांनी एमआयव्ही विषयी काळजी घेण्याविषयी माहिती दिली. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे यांनी एचआयव्ही व एसटीआय या संदर्भात माहिती दिली. अशोक तायडे यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह बाधीत लोकांना कोण कोणत्या शासकीय योजना दिल्या जातात विषयी माहिती देण्यात आली त्यात शासकीय अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, यांच्या कडून मोफत दाखले व शासकीय योजना उपलब्ध करून द्यावे तसेच जेणे करून पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती गोपनीय ठेवावे असे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व सर्व तालुक्यातील ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी साठी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. गजरे डॉ. साजिद तडवी यावलचे कल्पेश पाटील , सावखेडासिम लॅब टेक्नीशियन, या शिबीर कार्यक्रमात सुमारे पस्तीस लोकांनी स्वइच्छेने कोरोनाचे स्वॅब डॉक्टर गौरव भोईटे, व कल्पेश पाटील यांनी घेतले रक्त संकलन विभागाचे रवींद्र माळी व छाया नन्नवरे यांनी माहिती दिली . वसंतकुमार संदानशिव यांनी केले तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते सर्व ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक वसंतकुमार संदनशीव, लॅब टेक्निशियन रवींद्र माळी, लिंक वर्कर अशोक तायडे, छाया न्नानवरे, आसीफ पिंजारी , लतेश नेमाडे, प्रशांत शिंपी, संतोष भंगाळे राहुल बावस्कर, राजेश साळुंके आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .हेमंत बऱ्हाटे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.