यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आगामी काळात सर्वत्र नगर परिषदच्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकी होवु घातलेल्या असतांना येथील यावल नगर परिषदेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी मनोज म्हसे यांची ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर बदली झाली आहे.
यावल नगर परिषद येथे मार्च २o२२ पासुन मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेले मनोज म्हसे यांची मुरबाड जिल्हा ठाणे ( मुंबई ) येथील नगर परिषदचे मुख्याधिकारी या पदावर बदली झाली असुन . मनोज म्हसे यांच्या प्रशासकीय कारणास्तव दिनांक २९ / १२ / २०२२ डिसेंबर रोजी बदली करण्यात येत असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासनउप सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र येथे प्राप्त झाले आहे. यावल नगर परिषदच्या मुख्याधिकारी पदावर दिनांक २३ मार्च २०२२पासुन साधारणता नऊ महीन्यांच्या आपल्या कार्यकाळात म्हसे यांनी प्रशासकीय सेवेत कार्यरत असतांना त्यांनी कार्यतत्पर, शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ असे अधिकारी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती . यावल नगर परिषदच्या पुनश्च रिक्त झालेल्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार कुणाकडे जाते हे अद्याप निश्चित झालेले नसल्याचे सुत्रांकडून माहीती प्राप्त झाली आहे.