यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल नगरपरिषदेच्या वतीने ७५ फूट उंचीवर ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल नगरपरिषदेच्या वतीने घर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरातून तसेच विविध शाळा विद्यालय, रॅली व मिरवणुका बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती आदी कार्यक्रम उत्सफुर्तपणे राबविले जात आहे.
तसेच स्वातंत्र्यदिनी नगरपरिषदच्या समोर ७५ फूट उंचावर विशाल राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ फूट उंचीचा पोल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. घर घर तिरंगा या देशव्यापी अभियान अंतर्गत नागरिकांना नगर परिषदच्या माध्यमातुन विविध आकाराचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या मोहिमेत सहभागी होऊन देश प्रेमाची ज्योत जागवावी असे आवाहन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.