यावल प्रतिनिधी । येथील नगरपालीकेचे कनिष्ठअभियंता एस. ए. शेख यांनी बेकायदेशीर कामे करून कामात सतत हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्यांना मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबीत केले आहे.
येथील नगरपालीकेचे कनिष्ठ अभियंता एस. ए. शेख यांनी पालिकेया ठरावानुसार कामे न केल्याने, संबंधित कामांची काही कागदपत्र आढळून येत नसल्याने व कामकाजात सतत हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केला. असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे
बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांसंबंधीचे जे देयके ठेकेदारांना प्रदान करण्यात आलेली आहे त्या संबंधित जे लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले त्याबाबतची पूर्तता न करणे पत्रांचा खुलासा न करणे असे अनेक कारणावरून शेख सईद यांना मुख्याधिािरी बबन तडवी यांनी अखेर निलंबीत केले आहे.
कानतोडीच्या नाल्यातील अनधिकृत संरक्षण भिंतीचे बांधकाम, वसुंधरा अभियानाचे अनियोजीत काम, तसेच जलसंवर्धनाच्या विविध कामात त्यांनी हलगर्जीपणा करून दिलेल्या पत्राचे खुलासे न केल्याबद्यल महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १८६५ चे कलम ७९ व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ मधील तरतुदीनुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबनाचे आदेश बजावले आहेत. चौकशीअंती जे नव्याने दोषारोप समोर येतील त्याबाबातही आपणास नव्याने आदेश बजवण्यात येतील असे आदेशात नमूद आहे.