यावल, प्रतिनिधी । कोरोना विषाणू चे प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यांमध्ये मागील वीस दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून या काळात राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ल यावल शहर व फैजपूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येऊन ५ हजार २८१ नागरिकांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गाव सोडून इतरत्र कामानिमित्त व नोकरी संदर्भात इतर जिल्ह्यामध्ये हा परप्रांतात गेलेले नागरिक या काळात परत येऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तालुका पातळीवरील नगरपालिका नगर पंचायत व ग्रामीण पातळीवर आरोग्य यंत्रणा ग्रामपंचायत पोलीस पाटील आशा वर्कर व आदी सक्रिय झाले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने रात्री-अपरात्री बाहेर गावाला गेले नागरिक आपल्या गावात आपल्या घरी परतीच्या मार्गावर आहेत. अशा नागरिकांची दि. १७ एप्रिलपर्यंत यावल तालुक्यातील यावल शहर व फैजपूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५ हजार २८१ नागरिकांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, किनगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरगावाहून आपल्या गावात येणाऱ्यांची संख्या वाढत असून सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहून अशा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी व शासनास सहकार्य करावे असे आवाहन यावल तालुका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले आहे