यावल तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील रविवारी दुपारी  अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळीवाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.

 

यावल तालुक्यात व परिसरात रविवारी दुपारी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास अचानक मान्सून पुर्वीच्या आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या मुसळधार पावसासह आलेल्या वादळीवाऱ्याने यावल-चोपडा मार्गावर तसेच किनगाव डांभुर्णी, यावल, फैजपुर या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळल्याने सुमारे २ तास या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. मात्र युद्ध पातळीवर ही झाडे या मार्गावरून बाजुला करण्यात आल्याने पुनश्च या रस्त्यांवरील वाहतुक २ तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील फैजपुर व न्हावी , आमोदा, डोंगर कठोरा , वाघझीरा , नायगाव गावांसह तालुक्यातील ईतर ठीकाणी देखील गारपिटचा तडाका बसला असुन , या क्षेत्रात मोठया प्रमाणावर केळी पिकांचे सुमारे एक हजार हेक्टरवरी क्षेत्र बाधीत असुन यात शेतकरी बांधवांचे सुमारे जवळपास सहा ते सात कोटीचे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे केळी पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या टोल क्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन यावल तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .

Protected Content