यावल तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

 

यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी वनोली ,कोरपावली , सावखेडासिम , चिंचोली , दहिगाव , हिंगोणा, डोंगर कठोरा, भालोद ,नावरे , बामणोद मारूळ ,हंबड्री ग्रामपंचायतीसार्ठी मतदान शांतते पार पडले

विविध ठीकाणच्या जिल्हा परिषदच्या शाळेत मतदानास सुरुवात झाली होती सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत कोरपावली येथे ७३.९६ टक्के , महेलखेडी ७६ .५५ इतके मतदान झाले दहीगाव येथे ७८ .३३ , हिंगोणा येथे ७६ .५५ , भालोद येथे ६७ .२६, सावखेडासिम ग्रामपंचायतीसाठी ७४ .५५ , वढोदे प्र . यावल येथे ८६ .७२ , डोंगर कठोरा ७२ .८४ , व तालुक्यात वनोली येथे सर्वाधीक ९१ .२४ टक्के मतदान झाले .

निवडणुकीत प्रथमच युवकांचा मोठा सहभाग दिसुन आला , विविध गावातील काही प्रभागात तुल्यबळ लढत होत असल्याचे चित्र आहे .आपआपल्या उमेदवारास विजयी करण्यासाठी मोठी रस्सीखेच झाल्याने तरुण वर्गात या निवडणुकीत मोठा उत्साह निर्माण झाल्याने मतदान केन्द्रा बाहेर युवकांच्या मतदानासाठी रांगा दिसुन येत होत्या . शेवटच्या टप्यात मतदानाची टक्केवारी वाढली, काही गावांच्या मतदान केन्द्रास शिरपुर विभागाचे प्रांत अधिकारी व निवडणुक निरिक्षक व्ही व्ही बादल यांच्यासह यावल तालुका निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांनी भेट देवुन पाहणी केली . आता १८ जानेवारीस होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे .

Protected Content