यावल, अय्युब पटेल | जिल्ह्यात भू स्वामित्व योजनेंतर्गत सर्व गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे ड्रोन मोजणीपूर्वी यावल तालुक्यातील सर्व गावांमधील गावठाण मोजणीच्या कामास ६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून याचे औपचारिक सुरूवात दि. १३ रोजी ऑक्टोबर रोजी यावल तालुका भुमि अभीलेख चे उपअधिक्षक मुकुल तोठेवार, गटविकास अधिकारी विलास भाटकर आदींच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व गावाच्या गावठाण मधील जमिनीचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण व भूमापन स्वामित्व योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींमधील हद्दी निश्चित होतील. त्यांची अद्ययावत माहिती मिळेल. पडीक बिनवापराच्या आणि रेकॉर्ड नसलेल्या जमिनींचीही माहिती मिळेल. जमिनींचे वाद मार्गी लागतील. पडीक जमिनी नेमक्या कोणाच्या आहेत, याची माहिती संकलित होईल. मोकळ्या भूखंडावर विकास प्रकल्पांचे आरक्षण टाकणेही सोपे होणार आहे. महत्वाचे म्हणजे शासनाला जमिनीचा शेतसारा व इतर उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत, गटकिवास अधिकारी, तहसीलदार व भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचार्यांची याकरता मदत घेतली जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून केल्या जाणार्या मोजणीनंतर नागरिकांना सनद मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील जमिनींना चांगले भाव येणार आहेत. त्याचप्रमाणे गावठाणाच्या जागेत होणारे अतिक्रमण काढणे शक्य होणार आहे. यानुसार
यावल तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरुपात किनगाव सजातील दगडी, पिळोदे खुर्द, थोरगव्हाण, बोराळे, वाघोदे, नावर, वाढोदे प्र. सावदा, गिरडगाव, सावखेडा सिम, हरिपुरा, मोहराळे, मेलखेडी, कासारखेड, उंटावद, शिरागड, पथराळे या गावांची गावठाण हद्द सर्वेक्षणाचे करण्यात येत आहे. तालुक्यातील गावठाण हद्द सर्वेक्षणास जवळपास एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यलयास पाठविल्यानंतर प्रत्यक्ष ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे.