यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण परिसरात कोरोना विषाणुचा संसर्ग हा वेगाने पसरत आहे. आज कोरोना पॉझीटीव्ह रूणांची संख्याही ५००वर जावुन पहोचली आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही ३६०च्या जवळपास पोहचली आहे.
यावल तालुक्यातील फैजपुर शहर हे कोरोनामुक्त झाले असून या ठिकाणी आजपर्यंत कोरोना बाधीत रुग्णांनाची संख्याही ७३ वर पहोचली होती. त्यापैकी ६६ रुग्ण हे उपचार घेवुन घरी परतले आहेत. आजपर्यंत ७ कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला आहे . यावल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केन्द्रनिहाय रुग्णांची संख्याही पुढीलप्रमाणे आहे. भोलाद प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत असलेली रूग्ण ४४ यात भालोद १४, अट्रावल १२, चितोडा ०६, सांगवी बु॥ ०३, चिखली बु॥०३, डोंगर कठोरा०४ असुन ८ रूग्ण हे उपचार घेत आहेत. भालोद १३, अट्रावल १२, चितोडा o५, सांगवी , चिखलीoडोंगर कठोरा०३ही रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. दोन जणांचा मृत्यु झाला आहे .पाडळसा प्राथमिक आरोग्य केन्द्र रुग्णसंख्या ३४ डिस्चार्ज रूग्ण २९ मृत्यु झालेले रुग्ण दोन उपचारार्थ दाखल रूग्ण दोन, हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत येणारे रुग्ण ५४ यातील हिंगोणा १०, न्हावी ३३, आमोदा ९, पिंपरूड ५ तर हंबर्डी१ अशी असुन यातील २६रूग्ण डिस्चार्ज झाले असुन २४ रूग्ण हे उपचार घेत असून ४ रूग्णांचा मृत्यु झाला आहे . सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत रूग्णा संख्याही ३१ असुन यातील २२ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असुन सद्या ५ रुग्णहे उपचारार्थ दाखल असुन ४ कोरोना बाधितांचा यात मृत्यु झाले आहे . कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या कार्यक्षेत्रात १०४ रूग्ण मिळाले असुन ८१ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असुन , साकळी येथील ४ कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला आहे. किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्रातील रूग्णसंख्या एकूण ५७ डिस्चार्ज ३५ तर मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्याही ५ झाली आहे . आज यावल तालुक्यात मिळालेल्या बाधीत रुग्णांची संख्या ९ असुन यात सांगवी २, डांभुर्णी ३, कोरपावली १, नायगाव १, दहिगाव १ आणि बामणोद १ असे नविन रूग्ण मिळुन आले आहे. सद्या शासनाने अनलॉक जाहीर केले असले तरी सोशल डिस्टसिंग , सार्वजनिक ठिकाणी उदारणार्थ लग्न सोहळा वाढदिवस कार्यक्रम , मयताची अंत्ययात्रा व अंत्यविधी अशा विविध कार्यक्रमांना मात्र लॉकडाऊनचे नियम सुरूच राहणार असुन नागरीकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर , पोलीस निरिक्षक अरूण धनवडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी केले आहे .