यावल : प्रतिनिधी । संपुर्ण जगासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले यात तालुक्यात कोरोनाबाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असून वर्षभरात सुमारे दोन हजार लोक बाधीत आहेत .
मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणि राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु केली होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण कोरपावली येथे सापडला होता यावल शहरातही जुनअखेर शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ . सलीम शेख यांचा मुलगा कोरोना बाधीत आढळुन आला होता , पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र असे ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले होते .
तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासन , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने उल्लेखनिय कार्य केले त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले . डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या शासन आदेशाची अमलबजावणीसाठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे सन्समर्नीय आहे .
आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७० पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादायक व प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे वारंवार प्रशासनाच्यावतीने सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे , सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .