यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्ग संपूर्ण यावल तालुक्यात वेगाने पसरत असून तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्यावर पोहोचली आहे. याबाबतीत रुग्णांमध्ये अनेक विद्यमान नेते मंडळींचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान दि. २९ जुन रोजी कोरपावली तालुका यावल येथील एका ८० वर्ष वयोवृद्ध व्यक्तीचा नशिराबाद येथील गोदावरी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने त्यांचे मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी अहवालात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीचे संशयित म्हणून कोरपावली गावाचं दफनविधी करण्यात आले . याप्रसंगी गावातील मंडळी व नातेवाईक यांनी अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदी आदेश मोडण्याच्या कारणावरून मयत व्यक्तीचा मुलगा व कोरपावली गावाचे सरपंच जलील सत्तार पटेल त्याच्याविरुद्ध गावातील पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
दरम्यानच्या काळात साकळी परिसरातील एका जिल्हा परिषद सदस्य कोरोनाच्या संसर्गाची लागण झाली असून त्यांच्यासह अनेक लोकांना फैजपूर येथील कोविड सेंटरला पाठवण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेने लॉकडाऊन काळात मुंबई,पुणे आदी शहरांतून गावांत आलेल्या नागरिकांबाबत तात्काळ उपाय योजना आखावी हा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दि. ३० रोजी कोरपावली गावातील मरण पावलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सात लोकांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याचे माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी दिली आहे. यासंदर्भात कोरपावली गावातील मयताच्या संपर्कात आलेल्या अजून काही लोकांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.