यावल तालुक्यात कोरोनाकाळात बंद जिल्हा परिषद शाळांची दयनिय अवस्था

 

यावल : प्रतिनिधी  । कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या सरकारी शाळांची तालुक्यात दुरवस्था झाली आहे

 

दिड वर्षापासुन राज्यात कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाने या काळात अनेकांचे जिव घेतले याच पार्श्वभुमीवर राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन संचारबंदी काळापासुन सर्व जिल्हा परिषदच्या शाळा पुर्णपणे बंद केल्या

 

यावल तालुक्यातील देखील शिक्षण विभागाने शासन नियमांचे आधार घेवुन सर्व शाळा बंद केल्या आहेत . कोरोनाच्या संचारबंदी काळात राज्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद करण्याचा निर्णय जरी घेतला असेल तरी देखील राज्य शासनाच्या वतीने त्या त्या शाळेतील शिक्षकांना वेळ न चुकता नियमीत पगार दिला जात  आहे  कोरोना संसर्गाच्या गोंधळात ओस पडलेल्या शाळाची मात्र दयानिय अवस्था होत आहे . संरक्षणाअभावी शाळांचा गैरकामांसाठी उपयोग होत असल्याचे दिसुन येत आहे . शाळेतील एकही शिक्षक शाळेकडे येवुन शाळेची झालेली अवस्था बघण्यास येत नसल्याचे रिकामटेकड्यांना चांगलेच पावत आहे .बंद पडलेल्या शाळा येणाऱ्या काळात सुरू होतील पण संचारबंदीच्या काळात शाळांचे होत असलेल्या नुकसानींची भरपाई कशी होणार असा प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थी पाल्यांना पडला आहे  टवाळखोर मंडळीकडुन देखरेखअभावी नको ते काम या ठीकाणी होत असतांना शिक्षकांनी शाळा बंदीच्या काळात कतृत्वाची जाणीव ठेवुन किमान शाळेची देखरेख करण्याची जबाबदारी तरी पार पाडावी अशी अपेक्षा आपण शिक्षकांकडुन व्यक्त करू या अशी अपेक्षा शिक्षण प्रेमींकडून व्यक्त होत आहे

 

Protected Content