यावल प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधी गोरगरीब नागरिकांना शासनाने यावल तालुक्यातील १२४ दुकानात स्वस्त धान्य दुकान अंतर्गत अंत्योदय प्राधान्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच धान्य वितरणास प्रारंभ करण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांनी यावल तालुक्यातील एक लाख ४१ हजार २२४ रेशन कार्डधारकांना घरपोच धान्य वाटप करण्याची मंजुरी दिली आहे. या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे तांदूळ आणि गहू वाटप सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम यावल शहरातील अशपाक अहमद यावल कंजूमर सोसायटी, संजिदाबी मुस्ताक खान, मधुकर भिवाजी पाटील अंजाळे, विजय सुपडू सपकाळे वाघळुद, सातोद व कोळवद येथील विकास सोसायटी तसेच असेच आसिफ खान ताहेर खान या स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वितरण योजनेला प्रारंभ झाला आहे. रेशन कार्ड धारक गोरगरीब गरजू नागरिकांनी आपल्या जवळच्या संबंधित स्वस्त धान्य दुकानावर जाऊन धान्य मिळवून घ्यावे असे आवाहन तहसीलदार जितेंद्र कुवर निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, तालुका पुरवठा विभागाचे राजेंद्र भंगाळे व सखावत तडवी यांनी नागरिकांना केले आहे.