यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता अल्पवयीन मुलगी ही गावात चौधरी यांच्याकडे घरकामासाठी गेली होती. त्यानंतर चौधरी यांच्या घरून मुलीच्याघरी फोन आला की, तुमची मुलगी कामाला आली नाही असे सांगितले. त्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वत्र नांतेवाईकांकडे व व इतर ठिकाणी तिचा शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र पाटील करीत आहे .