यावल (प्रतिनिधी)। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील कार्यक्षेत्रातील विलगीकरण कक्षांची पाहणी करून जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप कोठावदे यांनी आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी उपाय म्हणून विविध विषायांवर चर्चा करण्यात आली.
राज्यात कोरोना या अत्यंत घातक अशा संसर्गजन्य विषाणुने जवळपास पन्नास दिवसाच्या कालावधीनंतर यावल तालुक्यात फैजपुर मार्गाने शिरकाव केला असुन, याचा प्रादूर्भाव वाढु नये या दृष्टीकोणातुन खबरदारीचे उपाय म्हणुन जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ यावल तालुक्यातील आढावा घेण्यासाठी आपली भेट देवुन परिस्थितीची माहीती घेतली . या संदर्भात तालुक्यात कोवीड१९च्या पार्श्वभुमीवर सद्यस्थितीची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी यावल तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील विलगीकरण कक्षांची जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप कोठावदे यांनी भेट देवुन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावल तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, जि.प. आरोग्य विभागाचे अजय चौधरी, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत भाऊलाल बऱ्हाटे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीकोणातुन अधिक आवानात्मक व कठीन राहणार असल्याचे सांगुन यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणेसह नागरीकांना देखील सावधानता बाळगुन अधिक सर्तक राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप कोठावदे यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप कोठावदे, प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अजय चौधरी, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बि.बि.बारेला यांच्या पथकाने यावल कार्यक्षेत्रातील सातोद कोळवदसह यावल येथील विलगीकरण कक्ष असलेल्या डॉ .झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व माध्यमीक विद्यालय, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमीक्विद्यालय आणी कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षांना भेट देवुन क्वारंटाईन करण्यात आलेल्या बाहेरगावाहुन आलेल्या नागरीकांच्या विविध समस्या प्रकृती व आरोग्य विषयाची माहिती जाणुन घेतली. या संदर्भात त्यांनी तालुका आरोग्य यंत्रणेस सज्ज राहण्याचे सुचना दिल्यात.