यावल तालुक्यातील जप्त केलेल्या वाहनांचा १८ रोजी लिलाव; तहसीलदार यांची माहिती

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. १८ ऑक्टोबर रोजी यावल येथे वाहनांचा लिलाव होणार असल्याची माहिती यावल तहसीलदार महेश पवार यांनी आज मंगळवारी १२ ऑक्टोबर दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.  मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी १८ ऑक्टोंबर, २०२१ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, यावल येथे जप्त केलेल्या पाच वाहनांचा  लिलाव करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, यावल यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार महेश पवार यांनी आज मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content