यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात बससेवा बंद करण्यात आली होता. त्यानंतर अनलॉक नंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील लालपरीची सेवा पुर्णपणे सुरूवात झाली नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्वरीत बससेवा सुरूवात करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने अनेक बंद एसटी बससेवा पुरर्वत करण्यात आल्या. यावल आगारातुन अद्यापपर्यंत ग्रामीण क्षेत्रातील अनेक बसफेऱ्या मात्र सुरू न केल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थी व विद्यार्थीनींनाशाळा विद्यालयात येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सोसावे लागत आहे. एसटी महामंडळाने या यावल तालुक्यातील बंद केलेल्या बससेवा सुरू कराव्यात. आणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळावे.
या निवेदनावर शाम पवार, किशोर नन्नवरे, विभाग अध्यक्ष आबीद कच्छी, गौरव कोळी , रोहन धांडे , रितेश धांडे , रिषीकेश कानडे , हिमांशु पवार यांच्या स्वाक्षरी आहे . दरम्यान ही ग्रामीण परिसरातील बससेवा पुर्वरत सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .