यावल प्रतिनिधी । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दिर्घकाळा पासुन प्रलंबित असुन , या मागण्यांची पुर्ततता न झाल्याने शिक्षकांवर उपाशीपोटी अध्यापनाचे कार्य करण्याचा प्रसंग ओढवला जात आहे. या संदर्भात आज ४ सप्टेंबर रोजी यावल तालुका कनिष्ठ महावियालयीन शिक्षक संघटनेतर्फे यावल येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी चर्चा करून शासनाने लिखित स्वरूपात शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. १८ फेब्रुवारी २o२o रोजी त्या वेळेस एका महीन्यात आपल्या या मागण्या संदर्भात आदेश काढु असे आश्वासन शिक्षणमंत्री यांनी दिले असुन मात्र शासनाकडुन अद्यापपर्यंत आदेश काढण्यात आलेले नाहीत, त्यानंतर संघटनेच्या वतीने वेळोवेळी मागणी करून देखील राज्याचे शिक्षणमंत्री हे चर्चा करण्यास असमर्थ दिसुन येत असल्याने यामुळे कनिष्ठ शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे वेळ नसल्याच्या पार्श्वभुमीवर कनिष्ठ शिक्षक संघटनेच्या वतीने उद्या ५ सप्टेंबर हे शिक्षक दिन हा काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री महोदयांना २८ ऑगस्ट २०२०रोजी ई – मेल व्दारे पाठवण्यात आले आहे. उद्या ५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळा दिवस म्हणून काम करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या आहेत मागण्या
या मुल्यांकन पात्र घोषीत, अघोषीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे , त्याचबरोबर केवळ घोषीत यादीचाच विचार न करता अघोषीत यादीतील शिक्षकांना देखील वेतन अनुदान देण्यात यावे.
दशकापासुन अधिक काळ २००२-२o०३पासुन वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.
आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन देण्यात यावे .आयटीचे शिक्षक मागील १० वर्षापासुन अधिक काळ विना वेतन /अत्यल्प वेतनावर कार्यरत आहेत .कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आयटी शिक्षक संबधीत शाळा महाविद्यालयात अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत . बोर्डाच्या परिक्षेत सर्व ऑनलाइन कामे ही शिक्षकच करीत आहेत . त्यामुळे याविना वेतन, अत्यल्प वेतन असणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन अनुदान देणे गरजे आहे.
सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी.
शासकीय कर्मचाऱ्यांना १० , २० , ३० वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आसवासित प्रगती योजना शिक्षकांना लागु करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन यावलच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर डी पाटील यांना यावल तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.एस.आर. वाघ, सचिव प्रा.एन.बी. वाणी, सहसचिव प्रा.ए.एस. इंगळे, प्रा.डी.जे. पाटील, आर.बी. शिरोळे यांच्या स्वाक्षरी आहेत.