यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई पुन्हा निवड

 

यावल, प्रतिनिधी । येथील यावल तालुका तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समीर तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावल तहसील कार्यालयात तहसीलदार आर. डी. पाटील आणि  निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुका तलाठी संघाची नुतन कार्यकारणी संदर्भात बैठक घेण्यात आली. यात संघाच्या तालुका अध्यक्षपदी पुनश्च हिंगोणा येथील तलाठी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी परसाडे तलाठी समिर तडवी यांची एकामताने निवड करण्यात आली. संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधीपदी ईश्वर कोळी, तालुका सचिवपदी टेमर बारेला, खजिनदारपदी निखिल मिसाळ, सहसचिवपदी भुषण सुर्यवंशी, कोषाध्यक्षपदी के. के. तायडे, महीला प्रतिनिधी सुचिता देशभ्रतार यांचा नुतन तालुका कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.  निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत तहसीलदार आर, डी, पाटील, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार आणि बैठकीस उपस्थित तलाठी संघाच्या सदस्यानी व पदाधिकाऱ्यांनी केले.

 

 

 

 

Protected Content