यावल तालुका कृषी विभागातील आकृतीबंध दुप्पट करा : शेतकऱ्यांची मागणी

यावल,  प्रतिनिधी । येथील तालुका कृषी कार्यालयातील विविध महत्वाची पदे ही रिक्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेती विषयक कामांची परवड होत आहे. ही रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत अशी मागणी शेतकरी बांधवानी केली आहे. 

 

कृषी  विभागातर्फे शेतीविषयक तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसार महत्त्वाची भूमिका पार पडली जात आहे. असे असतांनाच यावल तालुका कृषी विभागातील शेकडो  मंजूर पदे रिक्त होताना दिसत आहे.  मुळातच कृषी विभागाचा सध्याच्या काळात मंजूर  आकृतीबंधच हा गरजेच्या ५० टक्केपेक्षा कमी असतांना ही सध्य: स्थितीला मंजूर पदापैक्की देखील सरासरी ५० टक्के पदे रिक्त आहेत. दिवसेंदिवस त्यात रिक्त पदांची भर पडत आहे.  याकरीता कृषी विभागातील रिक्त पदे तर भरावीच शिवाय सध्याच्या मंजूर आकृतीबंधात सुधारणा करून सध्याचा  आकृतीबंधाच्या दुप्पट करून तातडीने संपुर्ण पदे भरण्याची मोहीम शासनाने हाती घ्यावी अशी मागणी यावल व परिसरातील जाणकार व प्रगत शेतकऱ्यांनी केली आहे.  यावल तालुक्यातील कृषी कार्यालयात एकुण मंजूरपदे  तालुका कृषी अधिकारी १,  कृषी अधिकारी  ४,  कृषि पर्यवेक्षक ७  ,  सहाय्यक अधिक्षक १, वरिष्ठ लिपीक १ ,  अनुरेखक ५,  कृषि सहाय्यक /सेवक / तंत्र सहाय्यक  ३७ , वाहन चालक १ ,  शिपाई / पहारेकरी ६ अशी एकुण ६७ पदे असून  एकुण भरलेली पदे ३२तर रिक्त पदे ३५ आहेत .

 

Protected Content