यावल प्रतिनिधी । येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांचा कोरोना विषाणु महामारीच्या संकटासमयी नागरीकांच्या आरोग्याविषयी शासनाच्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करून उल्लेखनिय उत्कृष्ठ नागरी सेवा दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणुन सन्मान मिळाल्याबद्दल यावल तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याहस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणुन सन्मानपत्र जितेन्द्र कुवर यांना गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत सत्कार करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार आर.डी.पाटील, कोषागार अव्वल कारकुन एम.एफ. तडवी, संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार बी.बी.भुसावरे, निशा चव्हाण, सुयोग पाटील, किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप, पुरवठा विभागाच्या अंकीता वाघमळे, पुरवठा विभागाचे सकावत तडवी, इंगायो विभागाचे अव्वल कारकुन रविंद्र मिस्तरी, संतोष पाटील, दिपक भुतेकर, दिपक बाविस्कर यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मला मिळालेला हा सन्मान आपण सर्वानी कोरोना संसर्गाच्या संकट काळात एकसंघ एकजुटीने केलेल्या उत्तम प्रशासकीय सेवा कार्याचे फलीत असल्याचे मनोगत तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी व्यक्त केले.