यावल प्रतिनिधी । येथील बऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर आज सकाळी कारचा भिषण अपघात झाला असून या अपघातात किती प्रवाशी जखमी झाले हे कळू शकले नाही.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावलपासून १ किलोमिटर लांबीवर असलेल्या चोपडा-यावल रोडावर आज १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रथमदर्शनी चोपडाकडून यावलकडे येत असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच १५ डीएस १०२९ या वाहनाचा केशरबाग हॉटेलजवळच्या समोरील छोटा नाला पुलावर वरून जात असतांना अचानक झालेल्या भिषण अपघातात चारचाकी वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात किती प्रवाशी जखमी झाले हे कळू शकले नाही. मात्र घटनास्थळी रावेर येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे बँक पासबुक पडलेले असुन यावर ए .एस. सिमित असे नाव आहे. अपघातास्थळी बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात देखील उपचाराची कोणतीही नोंद किंवा पोलीसात कोणतीही नोंद केलेली नाही.