यावल प्रतिनिधी । यावल ग्रामीण रूग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पाईपलाईनसाठी यावल खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे चेअरमन आर.जी.पाटील यांनी ११ हजार रूपयांची मदत केली आहे. तहसीलदार यांच्याकडे अकरा हजाराचे धनादेश सुपुर्त केला.
कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन कक्ष उभारणीसाठी तालुक्यातील सेवाभावी संस्था, समाजसेवी नागरीक दानसुर आणि विविध संस्थेचे पदाधिकारी यांनी या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी केले होते. त्यानुसार आज यावल येथील तहसील कार्यालयात यावल खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे चेअरमन आर.जी. पाटील यांनी नायब तहसीलदार आर.डी. पाटील महसुलचे सुयोग पाटील यांची भेट घेवुन ११ हजार रूपयांचे धनादेश यावल ग्रामीण रूग्णालयाच्या जवळपास ३० कॉटसच्या रुग्णांसाठी ऑक्सीजन पाईपलाईन उभारणीच्या करीता लोक सहभागात मदत केली. आर .जी