यावल ग्रामीण रूग्णालयात दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात १९ जणांवर गुन्हा

 

 

 

यावल प्रतिनिधी । निमगाव येथे दोन दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला ग्रामीण रूग्णालयात   दाखल केले असता अपघातात चूक कुणाची ? या वादात  दोन गटात रूग्णालयाच्या आवारात  हाणामारी झाली. यावल पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच फिर्यादीवरून दोन्ही गटातील  १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुक्यातील निमगाव येथे आज ९ मे रोजी दुपारच्या सुमारास शेतातून येत असलेल्या सुजीत उत्तम पाटील आणि रोहन संजय अहीरे यांच्या दुचाकीला  इमाम रजाखान समीरखान, अहमद रजाखान ( रा. यावल ) हे भुसावळकडून यावलकडे येत असतांना समोरासमोर दोन्ही दुचाकींचा अपघात झाला. अपघातील जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

 

दरम्यान दोन्ही गटात वादविवाद होवून तुफान हाणामारी झाली. घटनेचे वृत्त कळताच पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही उपद्रवीमध्ये हाणामारी सुरूच होती. पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी पोलीसांची जादा कुमक रुग्णालयात पाठवून १९ जणांना अटक केली आहे. सागर तावडे, भुषण तावडे, नितीन तावडे, आशिष तायडे, राकेश पाटील, हर्षल कोळी, तुषार कोळी, किरण तावडे, गणेश चौधरी, सागर पाटील, सागर तायडे, धरमसींग पाटील, अमोल तायडे ( सर्व रा.  निमगाव ता. यावल  ) तर यावल येथील मोहसीन तस्लीमखान, मजहर अजहरखान, परीध तस्लीमखान, मोहम्मद अकीब अकीलोद्यीन, जावेद हनिफ खाटीक, महम्मद कैफ अकीलोद्दीन अशा १९ संशयित आरोपींचा समावेश आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.

Protected Content