Home Cities यावल यावल कृउबा निवडणूकीसाठी राकेश फेगडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यावल कृउबा निवडणूकीसाठी राकेश फेगडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असुन नामनिर्दशनपत्र दाखल करण्याची मुदत २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ अशी आहे. २९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे यानी सोसायटी मतदार संघातुन आपले नामनिदैशनपत्र निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ. चव्हाण यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, कोरपावली विकासोचे संचालक मंडळासह पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound