यावल प्रतिनिधी । शहरातील दोन जण आज कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. तर आज कोरोना सदृश्य आजाराने मृत झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
यावल तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात गत काही दिवसांपासून शहरातील रूग्णांची संख्यादेखील वाढत आहे. यात आज दोन रूग्णांची भर पडली आहे. यात देशपांडे गल्लीतील ५६ वर्षीय तर बाबूजी पुरा भागातील ५१ वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. यात बाबूजी पुरा भागातील रहिवाशी रूग्णाचा भाऊ हा देखील आधी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येताक्षणी यावरचे तहसीलदार जितेंद्र कुवर, यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व आरोग्य कर्मचार्यांनी या दोन्ही रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील केला आहे.
तर दुसरीकडे, आज जळगाव येथे कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या देशमुख वाडयातील एका ६५ वर्ष वयाच्या महीलेचा कोरोना संयशीत रूग्ण म्हणुन मृत्यु झाला असुन त्या महीलेवर यावल येथील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यानंतर शहरातील कोलते वाडयात राहणारे माजी नगरसेवक हे गेल्या १५ दिवसापासुन तापाने आजारी असल्याने त्यांच्या पत्नी सोडुन कुणीही त्यांच्या सोबत राहात न होते त्यांची प्रकृती खालवल्याने अखेर आरोग्य यंत्रणेने तात्काळ दक्षता घेत शहरातील कोलते वाडयात राहणार्या पती आणी पत्नीला जळगाव येथे क्वारेन्टाईन केले आहे.
शहरात मागील आठदिवसात कोरोना बाधीत दोन रुग्ण दगावले असुन जवळपास आठ ते नऊ संशयित बाधीत मिळुन आल्याने शहरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर , ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा , यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या सोबत प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे.