यावल प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने १३ ते १५ जूनच्या दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
येथे कोरोनाचा विळखा प्रचंड वेगाने वाढला असुन ही साखळी तोडण्याच्या दृष्टीकोणातुन जनता कर्फ्यू चे आवाहन नागरीकांना करण्यात येत असुन यावल शहरामध्ये आजपर्यंत तब्बल तेहतीस रुग्ण बाधित आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर आज यावल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये तातडीची बैठक घाली. यात शहर व्यापारी मंडळ तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व सर्व नगरसेवक यांची स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येऊन उपाय योजनेबाबत चर्चा करण्यात आली त्यानुसार शहरातील कोरोना चे संक्रमण थोपविण्यासाठी उस्फूर्तपणे जनता कर्फ्यू चे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले..
शहरात कोरोना च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्य नागरिक हे भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत कोरोना ची साखळी खंडित होण्यासाठी जनता कर्फ्यू चे आयोजन शनिवार दिनांक १३जून ते १५ जून या कालावधी मध्ये शनीवार ते सोमवार असे तीन दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात अत्यावशक सेवा म्हणुन दवाखाना मेडिकल्स दूध विक्री केंद्र व कृषी केंद्र अशा सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी अनावश्यक रित्या घराबाहेर पडू नये व बंद कडकडीत पाळण्यात यावा असे आवाहन शहराचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सलिल महाजन, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नगरसेवक प्रा. मुकेश येवले,हाजी शब्बीर खान,ताहेर शेठ,अश्पाक सर,अय्यूब सर,सचिन मिस्तरी,निलेश गड़े, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे शिवसेनेचे शहर उपप्रमुख जगदीश कवडीवाले, मनसेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर,गोलू माळी,इकबाल खान, यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी केले आहे. दरम्यान, जनता कर्फ्यू यशस्वी करून कोरोना सारख्या अत्यंत घातक अशा आजाराची साखळी तोडण्यासाठी करीता शहरातील सुज्ञ नागरिक सहकार्य करतील अशी अपेक्षा नगर परिषद प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडुन व्यक्त करण्यात आली आहे.