Home क्राईम यावलच्या ‘त्या’ अपघातातील जखमीचा उपचारापुर्वीच मृत्यू

यावलच्या ‘त्या’ अपघातातील जखमीचा उपचारापुर्वीच मृत्यू

0
28

जळगाव प्रतिनिधी । यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर दुचाकी व अज्ञात ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात दोन जण जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला आहे. 

 

शेख शकील शेख ईबा (वय-४७) रा. आठवडे बाजार यावल असे मयताचे नाव आहे. यात मेहमुद खान फकीर खान (वय-५२) रा. दहिगाव ता. यावल हे गंभीर जखमी झाले आहे. शेख शकील आणि मेहमुद खान हे आज दुचाकी (एमएच १९ बी १८०७) बांधकामाच्या निमित्ताने भुसावळ येथे जाता होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास यावलहून भुसावळकडे जात असतांना अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने यात शेख शकील आणि मेहमूद खान जखमी झाले होते. यातील शेख शकील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांनी जळगाव येथे उपचारासाठी नेत असतांना भुसावळजवळ रूग्णवाहिकेत मृत्यू झाला आहे. अज्ञात ट्रक चालक हा घटनास्थळाहून ट्रक घेवून प्रसार झाला आहे.


Protected Content

Play sound