यावलचा अपहृत मुलगा पालकांच्या स्वाधीन ; आरोपी दिपक शर्माला अटक

 

 यावल :  प्रतिनिधी । येथील  फैजपुर मार्गावरच्या  हरीओमनगरमधील  खुल्या जागेवरून पालकांजवळ  झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण  करीत  फरार असलेल्या संशयीत आरोपीस पोलीसांनी तिन दिवसात पकडले  त्याच्या ताब्यातील  बालकास  कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले

 

यावल शहरातील फैजपुर मार्गावरील सुभानी पेट्रॉलपंपासमोरील हरिओमनगर येथील खुल्या जागेवर मुक्कामास असलेले सादीक शाह  ( २८ , रा – गोशालपुर ता . सोहरा जिल्हा जबलपुर ) यांच्या अडीच वर्षाच्या अरमान नांवाच्या मुलाचे  दिपक शर्मा या  आरोपीने २ एप्रीलच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास अपहरण  करीत  फरार झाला होता .

 

बालकाचे वडील सादीक शाह यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पो नि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान, सहाय्यक फौजदार अशोक बाविस्कर यांनी तपासाची चक्रे  फिरवत भुसावळ येथील आरोपी   दिपक  शर्मा ( रा  सिंधि कॉलनी भुसावळ ) याचा माग काढला होता

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, सहाय्यक फौजदार शरीफ तडवी, पोलीस कर्मचारी युनुस शेख , किशोर राठौड , विनोद पाटील , रणजीत जाधव यांनी सापळा रचुन संशयीत आरोपी दिपक बग्गाराम शर्मा यास  अटक केली आणि यावल पोलीसांच्या स्वाधीन केले. यावल पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडुन माहीती मिळवली  तो अपहृत  मुलास भुसावळ येथील एका  वेश्येला  विकण्याच्या बेतात होता ,  त्या महीलेने मी या मुलाला घेते पण तुला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल असे म्हणताच दिपक शर्मा यांने त्या ठीकाणाहुन पळ काढला होता  नंतर त्यास अटक करण्यात आली   यावल पोलीसांनी अपरहण झालेल्या मुलास त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले  आहे आरोपीला  अटक करण्यात आली आहे .

Protected Content