चारित्र्यावर संशय घेऊन पैशांसाठी महिलेचा छळ

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । नवीन घर बांधण्यासाठी आईकडून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरच्यांकडून अमानवी वागणूक दिली जात असल्याने  शहर पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात  आला आहे

 

फिर्यादी  प्रतिक्षा मनोज पुजारी (२१ रा. कुंदन नगर, घाट रोड चाळीसगाव)  दिड वर्षांपासून आपल्या आईजवळ मुलगीसह वास्तव्यास आहेत. प्रतिक्षा  पुजारी यांचे  लग्न १६ एप्रिल २०१६ रोजी मनोज पुजारी (रा. इंदोर)  यांच्याशी झाले आहे . पती मनोज पुजारी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत होता. सुरूवातीला आठ महिने पतीसह सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र मुलगी सृष्टी जन्माला आली आणि  प्रतिक्षा यांना सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.

 

सासरे हिरालाल पुजारी, सासु आशा पुजारी, दिर हर्षल पुजारी, नणंद दिपा पुजारी व ज्योती धनगर आदींच्या सांगण्यावरून पती मनोज  पुजारी  आईकडून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन प्रतिक्षा हिला दररोज मारहाण करत होता.२६ मार्च २०२१ रोजी सकाळी प्रतिक्षा हिच्या आईच्या फोनवर महिला दक्षता समिती जळगाव येथे दाखल केलेला गुन्हा मागे घे अन्यथा  मुलीसह तुला जीवे ठार  मारू अशी  धमकी पती मनोज पुजारीने दिल्याने पत्नी प्रतिक्षा पुजारी हिने शहर पोलिस ठाण्यात ५ एप्रिलरोजी दुपारी फिर्याद दाखल केली त्यानंतर या आरोपींच्या विरोधात  भादवि कलम ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला . पो  नि  विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास  पो ना  भगवान उमाळे  करीत आहेत.

Protected Content