यावल,प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचा तालुक्यात वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीत रुग्णांची दिवसंदिवस वाढती संख्या रोखण्यासाठी आज यावल शहर व्यापारी मंडळ आणि यावल नगर परिषद तथा सर्वपक्षीय तिन दिवसीय जनता कर्फ्यूला सर्व नागरीकांनी आपला अभुतपुर्व प्रतिसाद दिला असुन आज सकाळपासुनच शहरातील वैद्यकीय व कृषी सेवा वगळता व्यापारी बांधवांनी आपली सर्व व्यवसाय स्वयंस्फुर्तीने पुर्णपणे बंद ठेवली होती.
मागील शंभर दिवसापासुन यावल तालुक्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाने सर्वत्र विळखा घातला आहे. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. या प्रयत्नांना मदत म्हणुन यावल शहर व्यापारी मंडळ व यावल नगर परिषदचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील त्याचप्रमाणे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सलिल महाजन, सचिव सचिन मिस्त्री व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने तिन दिवसीय जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या यावल कर्फ्यूला प्रथम दिवशी शहरातील सर्व नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसुन येत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/282609439787891/