चाळीसगाव, प्रतिनिधी | जीवनात आपणास यशस्वी होण्यासाठी आपल्याजवळ विश्वास व जिद्द असली पाहिजे असे आवाहन ब्रिजमोहन चितलांगे यांनी केले. ते बी. पी. आर्टस् ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये कै. मोतिलालजी मंगलचंदजी अग्रवाल १६ वी अंतरमहाविद्यालयन वाणिज्य प्रश्न मंजुषाचे उदघाटनप्रसंगी बोलत होते.
गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लि. अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही मोठ्या पदांवर काम करा परंतु आपल्या आई वडिलांना विसरू नका. कारण आई वडिलांच्या संस्कारामुळे आपण आपले शिक्षण करून उच्च पदापर्यंत पोहोचलो आहे. कष्टा शिवाय जीवन नाही तसेच आपल्यात कलागुण खूप आहे त्याचा योग्य असा वापर करून पुढे वाटचाल केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब चव्हाण होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, स्पर्धेचे दाते ज. मो. अग्रवाल , डॉ. एम. बी. पाटील, अॅड. प्रदीप अहिरराव, राजूअण्णा चौधरी, माजी आमदार साहेबराव घोडे, अंबुजा ग्रुपचे वैभव पाटील, योगेश काळे, डॉ. ए. डी. येवले, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उप प्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्क , उपप्राचार्य अजय काटे, उप प्राचार्या एस.ए.पाटील, उप प्राचार्य बी. आर.येवले, प्रा. जे. एन. बागुल, के. एस. खापर्डे मॅडम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले तर जे. एम. अग्रवाल, के. एस. खापर्डे, प्रा. जे. एन. बागुल, प्रा. पूनम निक , प्रा. विभा पाटील यांनी स्पर्धे विषयी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रामध्ये विजयी संघाना अतुल नाईक यांच्या शुभ हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी अतुल नाईक यांनी सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता आपण भाग घेतलाच पाहिजे. वाचनाची सवय ठेवा कारण आजकालच्या तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे त्यामुळे वाचनावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. सोशल मिडीयाचा वापर कमीतकमी केला पाहिजे. तसेच शिक्षणा सोबतच मोठ्यांचा आदर करणे सुद्धा शिकलं पाहिजे असेही ते म्हणाले. अध्यक्षीयस्थानावरून बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द व चिकाटी असली तर तो विद्यार्थी शिक्षणामध्ये खूप काही शिकू शकतो म्हणून अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे.पहिले पारितोषिक रु. १५००/- एन. वाय. एन. सी. महाविद्यालय चाळीसगाव, दुसरे पारितोषिक रु. ११००/- एस. एम. महाविद्यालय, मुक्ताईनगर, तिसरे पारितोषिक रु. ७००/- आर्टस् सायन्स कॉमर्स महाविद्यालय,चोपडा, तर उत्तेजनार्थ पारितोषिक हे किसान महाविद्यालय, पारोळा यांना मिळाले. आभार उप प्राचार्य ए. व्ही. काटे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. धनंजय वसईकर यांनी केले.