जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्रीदत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आले. यात श्रीदत्त जन्मोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात पार पडला. यामध्ये गणेश याग, गीताई याग, चंडीयाग, स्वामी याग, रुद्र मल्हारी याग असे विविध याग उत्साहात संपन्न करण्यात आला. या सप्ताहात दररोज मोठ्या संख्येने बालगोपाल, महिला, भगिनी, पुरुष व सेवेकरी यांनी सहभाग नोंदवून आध्यात्मिक सेवेचा आनंद घेतला. बुधवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री दत्त जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी श्री दत्ताच्या दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच सप्ताहाची सांगता गुरुवार ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ केंद्र प्रमुखांनी दिली आहे.