जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे एका तरुणाची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली आहे ती माहिती अशी की, मयूर रवींद्र सोनवणे (वय-24, रा.धनगरवाडी, म्हसावद ता.जि. जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याची दुचाकी (एमएच १९ डीएन ६३७५) ही त्याच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने मध्यरात्री २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली, तरुणाने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आल्याने अखेर शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.