…म्हणून राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे, असे सांगत शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

 

याआधी राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवार यांनी कोरोनाविरुद्ध कसे लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतेय की मंदिर उभारल्याने कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकते. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे, असे शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता. त्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा देशात करोनाची सध्या स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content