…म्हणून मोदी आता नोकऱ्यांबाबत बोलत नाहीत : राहुल गांधी

 

rahul modi 759

 

जयपूर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार मिळवून देणार अशी घोषणा केली होती. परंतु गेल्या वर्षभरात देशातील एक कोटी तरुणांनी रोजगार गमावले आहेत. तरुणांचे रोजगार हिरावले गेले आहेत. परंतु मोदी आता रोजगारांबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. त्या ते पूर्ण करु शकले नाहीत, अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

 

काँग्रेसने जयपूरमध्ये ‘युवा आक्रोश रॅली’चे आयोजन केले होते. या रॅलीनंतर केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी राहुल म्हणाले, देशातील तरुण हीच देशाची मोठी संपत्ती आहे. परंतु 21 व्या शतकात देशातील या संपत्तीचं आतोनात नुकसान झाले आहे. कारण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या देशातल्या युवकांना देशासाठी काहीही करण्याची संधी मिळत नाही. मोदी आणि त्यांचे मंत्री आता केवळ सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा ), एनआरसी (राष्ट्रीय नागरिक नोंदयादी) आणि एनपीआरबद्दल बोलतात. परंतु देशासमोर ज्या मोठ्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीबाबत मोदी आणि त्यांचे मंत्री बोलायला तयार नाहीत, अशीही टीका राहुल यांनी केली आहे.

Protected Content