जळगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील मौजे जामदा येथे झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना पकडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट, जळगाव जिल्हा युनिट तसेच चाळीसगाव तालुका युनिटतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा की, मौजे जामदा ता.चाळीसगांव व येथे दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी जातीय अत्याचाराची घटना घडली. त्यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर पणे अर्थात दोन नंबरचा अवैधरित्या व्यवसाय करणारे यांनी सदरची जातीय अत्याचाराची घटना घडवली आहे. त्या संदर्भात एकूण ३६ लोकांवर मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, ३६ आरोपींपैकी केवळ १८ आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. परंतु उर्वरीत १८ आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. राजरोसपणे गावामध्ये फिरुन गावात दहशत निर्माण करीत आहे. या संदर्भात गावातील महिला वर्ग मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता गेले असता त्यांच्यावरच खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी पोलीस कर्मचारी पीएसआय धिकले यांनी दिली. गावात १८ आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. कारण त्यांच्यावर मेहुणबारे येथील पोलीस अधिकारी यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे सदरचे आरोपी हे बिनदिक्कतपणे गावात वावरुन महिलांची छेडखानी करीत आहेत. जेणेकरुन त्यांच्यावर दाखल असलेले केसही मागे घेण्यात यावीत. परंतु सदरची केस मागे घेण्याचा विचार देखील पीडीतांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे आर्थिक हातमिळवणी करुन आरोपी हे गावात महिलांची छेडखानी करीत आहेत. महिलांना लज्जा वाटेल अशी व त्यांचा विनयभंग होईल अशी कृती सारेच आरोपी करीत आहेत. या प्रकरणास मेहुणबारे येथील पोलीस कर्मचारी यांचा पाठींबा आहे. सदरचे आरोपी हे स्वत: असे कथन करतात की, पोलीस आमचे काहीही करु शकत नाही. कारण पोलीस आमच्या खिशात आहे. आमचा नेहमी पोलिसांची आर्थिक व्यवहार होत असतो. या सर्व प्रकारांमुळे गावातील महिलांना गावात राहणे मुश्कील झाले आहे. पोलीस अधिकारी दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी जामदा येथील गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास करीत नाही. उलटपक्षी आरोपींना पाठीशी घालण्याचे कार्य करीत आहेत. तसेच जातीय अत्याचाराला प्रोत्साहन देखील देत आहे. त्यामुळे मेहुनबारे येथील पोलीस कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. म्हणून महोदयांना नम्र विनंती की, जामदा ता. चाळीसगांव जि.जळगांव येथे दि. 21/9/2021 रोजी झालेल्या जातीय अत्याचाराची सखोल चौकशी करुन उर्वरीत 18 आरोपी यांना त्वरीत अटक करण्यात यावी. तसेच डीवायएसपी व पो.निरीक्षक, सहाय्यक पो.निरीक्षक यांच्यावर तात्काळ अॅट्रसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. मागणीची पुर्तता ८ दिवसांत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर अॅड. संतोष जाधव युवक जिल्हाध्यक्ष गौतम मोरे, जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅड. विलास भामरे, धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहीते, चाळीसगाव तालुका अध्यक्ष सागर निकम, जळगाव जिल्हाध्यक्ष शरद बाविस्कर, प्रेम तायडे, आकाश कदम, छोटूभाऊ बोरसे, माया पानपाटील, क्रांती खैरनार, शुभम येवले, भाऊसाहेब बळसाणे, निलेश गजभीये, वैशाली महाले, भाग्यश्री अहिरे, निखिल सराफ, आनंद अमृतसागर, विकास अमृतसागर, विशाल साळुखे, गोकुळ जाधव, सागर बागुल, मनोज जाधव, मयुर पगारे, शंकर बागुल, तुषार पगार, कल्पेश देवरे, जितेश सोनवणे, विनोद देवरे, यश तनेजा, बन्सीदादा मोरे आदी उपस्थित होते.
,
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1032726747270237