फैजपूर, प्रतिनिधी । इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त दि. ३०ऑक्टोबर रोजी मद्यविक्री, देशी दारु व बिअर बार बंद ठेवण्यात येऊन ‘ड्राय डे’ असावा अशी मागणीसाठी फैजपूर मुस्लिम बांधवांतर्फे प्रांताधिकारी यांना आज सोमवारी निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा असा की, देशातील व जगातील थोर पुरुषांच्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनांच्या राजपत्रात संपुर्ण देशात सूटी घोषीत केलेली आहे व त्या दिवशी देशातील सर्व शासकीय कार्यालय बंद असतात. तसेच शासकीय नियमानुसार मद्यविक्री , देशी दारु तसेच बिअर बार सुध्दा बंद असतात.म्हणून केंद्र व राज्य शासनाचे राज्यपत्रानुसार शासकीय सुटीच्या दिवशी येत्या दि.३०ऑक्टोबर रोजी इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीच्या दिवशी मद्य विक्री,देशी दारु व बिअर बार बंद ठेवणेचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतांना काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक रशीद तडवी, सैय्यद कौसर अली ,सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख इकबाल,
शाकिरखान , आसिफ मॅकेनिक उपस्थित होते.